Nagpur Mahanagarpalika Bharti: सरकारी नोकरीची संधी! नागपूर महानगरपालिकेत भरती 2025 सुरू!

Nagpur Mahanagarpalika Bharti: महानगरपालिकेत “स्क्वॉड झोनल लीडर” आणि “सुरक्षा सहाय्यक” या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 76 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जर तुम्ही या पदांसाठी पात्र असाल, तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2025 आहे. या लेखामध्ये आपण या भरतीसंबंधी सविस्तर माहिती घेणार आहोत.

पदाचे नाव आणि पदसंख्या:

  • स्क्वॉड झोनल लीडर: 2 जागा
  • सुरक्षा सहाय्यक: 74 जागा

शैक्षणिक पात्रता:

  1. स्क्वॉड झोनल लीडर: भारतीय सैन्यात उपसुबेदार/नायब सुबेदार किंवा नौदल व हवाई दलातील समकक्ष पदावरून निवृत्त.
  2. सुरक्षा सहाय्यक: भारतीय सैन्यात सिपाही/नायक हवालदार किंवा नौदल व हवाई दलातील समकक्ष पदावरून निवृत्त.

वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 45 वर्षांपर्यंत असावे.

ही भरती वाचा: कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध जागांसाठी भरती!

नोकरीचे ठिकाण: नागपूर

वेतनश्रेणी:

  • स्क्वॉड झोनल लीडर: ₹30,000/- प्रति महिना
  • सुरक्षा सहाय्यक: ₹24,000/- प्रति महिना
B335DC84 3D8E 4AC9 B41B F1A44B1F5441

अर्ज पद्धती: अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जुनी प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स, नागपूर (एमएस)

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 28 जानेवारी 2025
  • अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अधिकृत वेबसाईट: नागपूर महानगरपालिका भरती 2025 संदर्भातील सर्व अद्यतने व माहिती nmcnagpur.gov.in या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळतील.

महत्त्वाच्या लिंक

Leave a Comment