Central Bank of India Bharti: अंतर्गत 2025 साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीद्वारे कार्यालयीन सहाय्यक, अटेंडंट, वॉचमन कम गार्डनर आणि इतर पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या लेखात आपण भरती प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
- भरती विभाग: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था).
- भरती प्रकार: कंत्राटी स्वरूपाची नोकरी (1 वर्ष कालावधीसाठी).
- नोकरी ठिकाण: अकोला, महाराष्ट्र.
- पदसंख्या: 05 पदांसाठी भरती होणार.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन (Offline).
- अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख: 24 जानेवारी 2025.
पदांचे तपशील आणि पात्रता
प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता: पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधारक (एमएसडब्ल्यू, ग्रामीण विकासात एमए, समाजशास्त्र, मानसशास्त्रात एमए, बी.एड किंवा कृषी क्षेत्रातील बीएससी).
- अनुभव: संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.
ऑफिस असिस्टंट
- शैक्षणिक पात्रता: बीएसडब्ल्यू, बीए, बी.कॉम किंवा संगणकाचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
अटेंडंट
- शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.
हे पण वाचा: ग्रामपंचायत मध्ये 7वी 10वी पासवर सरकारी नोकरीची संधी!
वॉचमन कम माळी
- शैक्षणिक पात्रता: 7वी उत्तीर्ण.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना ₹60,000 ते ₹20,000 या श्रेणीत वेतन मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया:
- उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- दिलेल्या नमुन्यात अर्ज तयार करावा.
- अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा: प्रादेशिक व्यवस्थापक / सह-अध्यक्ष, जि. स्तर RSETI सल्लागार समिती (DLRAC), सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय-अकोला, “मंगेश” मंगल कार्यालय, आदर्श कॉलनी, अकोला 444004.
अर्ज फी:
या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही.
महत्वाच्या तारखा
- अर्जाची अंतिम तारीख: 24 जानेवारी 2025.
- अंतिम तारखेच्या नंतर पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
निवड प्रक्रिया
- पात्र उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीच्या कामगिरीवर आधारित केली जाईल.