लेखा व कोषागार विभागात नोकरीची संधी पगार 92 हजार भरा फॉर्म | Mahakosh New Bharti

Mahakosh New Bharti लेखा व कोषागरे या विभागात महाराष्ट्र शासनाचे नोकरी मिळवण्याची संधी तुमच्यासाठी आहे. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत, त्या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार ? हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ज्या उमेदवारांची या विभागात निवड होईल त्यांना 29,200 ते 92 हजार 300 रुपये इतकं पगार मिळू शकतो. भरतीसाठीची जाहिरात ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेली आहे, सविस्तर माहिती या ठिकाणी समजून घेऊया.

महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार विभागात ही प्रादेशिक विभाग अंतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे कोषागार कार्यालय, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, आणि कोल्हापूर, या कार्यालयात असलेली रिक्त पदांवरील भरती निघालेली आहेत. या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती तसेच पीडीएफ जाहिरात वाचून अर्ज करावेत.

⚠️ महत्वाची सूचना : वरील पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी अगोदर ही माहिती त्यानंतर जाहिरात वाचावी. त्यानंतर अर्ज कसे करावे, भरती संदर्भात कोणतेही नुकसानीसाठी वेबसाईट जबाबदार राहणार नाही.

महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार विभागात विविध पदासाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये कोणकोणती पदे भरली जातील यासंदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

भरती विभाग : लेखा व कोषागार विभाग पुणे या अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यात येत आहे.

पदाचे नाव : या विभागात विविध रिक्त पदे भरली जात आहे, यामध्ये कनिष्ठ लेखापाल (ज्युनिअर अकाउंटंट) या पदासाठीची भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करत असाल महाराष्ट्र शासनाची नियुक्ती तुम्हाला हवी असेल तर यासाठी शैक्षणिक पात्रता संविधायक विद्यापीठाची कोणते शाखेतील पदवी तांत्रिक आहर्ता यामध्ये मराठी टंकलेखनाचे केमन 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादा असा आवश्यक आणि शासकीय वंचित प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहे.
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे, ज्या उमेदवारांची निवड होईल त्यामध्ये त्यांना 29 हजार 200 रुपये पासून ते 92 हजार 300 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. भरती संदर्भातील जाहिरात आणि अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठीची माहिती खाली दिलेली आहेत.
अर्ज पद्धत : वरील पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीच्या माध्यमातून अर्ज करायचे इतर कोणतेही पद्धतीने आलेले अर्ज स्वीकार केले जाणार नाही.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 19 वर्षापेक्षा कमी नसावे, खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसाठी 38 वर्षे मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष या ठिकाणी असेल.
भरती कालावधी : उमेदवारांची ज्या पदांसाठी निवड होईल या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची संधी आहे.
पद संख्या : अर्ज करण्याकरिता एकूण पद संख्या किती असेल तर वरील पदासाठीच्या उमेदवारांची निवड होईल, त्यांना या ठिकाणी 75 पदे भरले जाणार आहे.
नोकरी ठिकाण : वरील पदासाठी 75 जागा भरल्या जात आहे, यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, आणि कोल्हापूर या कार्यालयात या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज 31 डिसेंबर 2024 पासून सुरु होणार आहे ते 30 जानेवारी 2025 पर्यंत या ठिकाणी अर्ज हे मागण्यात आलेले आहेत.

कामाची अपडेट : आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास वेळोवेळी माहिती तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर दिली जाईल. भरती संदर्भातील देखील माहिती आणि देण्यात आलेली आहे या भरती संदर्भात अर्ज स्वीकारण्याची पद्धत तसेच आणि आरक्षण वयोमर्यादा परीक्षेची स्वरूप परीक्षा शुल्क आणि इतर सविस्तर माहिती तुम्हाला तपशील दिनांक 26/12/2024 रोजी महाकोष शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती मिळेल.

भरतीची सविस्तर माहितीसाठी देखील अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. भरतीची पीडीएफ जाहिरात ऑनलाइन इतर माहिती खाली दिलेली आहेत.

Leave a Comment