NDA New Bharti राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकॅडमी या अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असेल तरच या ठिकाणी एनडीए मध्ये बारावी पासवर भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये अर्ज नेमकी कसा करायचा? कोणकोणते पद या ठिकाणी भरले जाणार आणि यासाठी शैक्षणिक योग्यता काय लागणार आहे या संदर्भातील माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अंतिम मुदत संपण्याअगोदर म्हणजेच 31 डिसेंबर 2024 ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. आता या भरती संदर्भातील अधिकृत जाहिरात, ऑनलाइन अर्ज वेबसाईट, आवश्यक शैक्षणिक आणि इतर पात्रता परीक्षा शुल्क, मुदत आणि भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
NDA New Bharti 2024 Details
मित्रांनो या भरतीमध्ये म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेवल अकॅडमी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये पूर्ण देशभरातून उमेदवार म्हणून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत या भरतीमध्ये एकूण 406 रिक्त जागासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
आता यामध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकॅडमी या विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
NDA भरती 2024 पद संख्या आणि शैक्षणिक पात्रता काय.?
भरतीचे नाव – भारतीय राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकॅडमी (NDA)
भरती विभाग – भारतीय राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकॅडमी एनडीए विभागात सरकारी नोकरीचे संधी
पदाचे नाव – वरील पदासाठी होत असलेल्या भरतीमध्ये म्हणजेच NDA मध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी या पदासाठी भरती केली जाणार आहे.
पदसंख्या – वरील पदासाठी अर्ज करत असताना 406 जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जात आहे, हे लक्षात घ्यायचं आहे.
शैक्षणिक पात्रता – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून 12वी पास आवश्यक असणार आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी, वरील पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी ठिकाण म्हणून संपूर्ण देशभरात नोकरी करावी लागेल.
NDA भरती 2024 वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, आवश्यक कागदपत्रे काय?
अर्ज प्रक्रिया – वरील पदासाठी अर्ज करत असताना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करायचे आहेत.
वेतनश्रेणी – ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना नियमानुसार पदांनुसार पगार मिळणार आहे, त्यासाठी जाहिरात पहा.
वयोमर्यादा : वरील पदासाठी अर्ज करत असताना अर्ज करणाऱ्या 2 जुलै 2006 ते 1 जुलै 2009 च्या दरम्यान जन्मलेला असणं आवश्यक आहे.
अर्ज शुल्क : वरील पदासाठी अर्ज करत असाल तर या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून उमेदवारांना 100 रुपये तर राखीव मागास अपंग प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क नाही येत अगदी मोफत फॉर्म भरू शकतात.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख : एनडीए मध्ये अर्ज करत असताना उमेदवारांनी लक्ष द्यायचं आहे की 31 डिसेंबर 2024 अंतिम मुदत आहे, या अंतिम मुदत आगोदर अर्ज सादर करून द्यायचे आहे.
NDA भरती 2024 आवश्यक कागदपत्रे?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड पासपोर्ट
- मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवारांची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- MS-सीआयटी आणि इतर अनुभव असल्यास प्रमाणपत्र
एनडीए भरती 2024 अर्ज कसा करावा.?
या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट खाली दिलेले आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात वाचा, आणि त्याच नंतर अर्ज सादर करा अर्ज संदर्भातील सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये देण्यात आलेली आहे. इतर संबंधित माहिती ऑनलाईन वेब पोर्टल वर मिळेल धन्यवाद.
मूळ पीडीएफ जाहिरात | https://upsc.gov.in/sites/default/files/Notific-NDA-NA-I-2025-Engl-11122024F.pdf |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php |