NHM New Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

NHM New Bharti 2025: (NHM) अंतर्गत राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण (NVHCP) कार्यक्रमासाठी Peer Supporter या पदासाठी रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गडचिरोली येथे ही भरती होणार आहे. आरोग्य विभागात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि पात्र उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचावी.

भरती विभाग: राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय-जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली.

पदाचे नाव: राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम (NVHCP) अंतर्गत Peer Supporter.

शैक्षणिक पात्रता:

  • अर्जदाराने किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अतिरिक्त पात्रता: अर्जदार स्वतः Hepatitis B किंवा Hepatitis C बाधित असावा किंवा त्याच्या कुटुंबातील जवळच्या नातेवाईकास हा आजार झालेला असावा.
  • याशिवाय, या क्षेत्रातील अनुभव असल्यास उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

एकूण रिक्त पदे: संपूर्ण भरती प्रक्रियेत 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

वयोमर्यादा:

  • अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे असावे.
  • जास्तीत जास्त वय 38 वर्षे असावे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयात सूट दिली जाईल.

भरती प्रकार: सदर पदे करार/कंत्राटी तत्वावर भरली जाणार असून ती शासकीय कायमस्वरूपी नोकरी नसतील.

मानधन: पदासाठी देण्यात येणारे मानधन हे एकत्रित स्वरूपाचे असेल. याशिवाय कोणतेही अतिरिक्त भत्ते दिले जाणार नाहीत.

अर्ज प्रक्रियेचा प्रकार: सदर भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.

अर्जाचा नमुना: अर्ज A-4 आकाराच्या कागदावर संगणकावर किंवा टंकलिखीत स्वरूपात तयार करावा अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती भरून संबंधित कागदपत्रे जोडावीत.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे:

  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे.
  • स्वतः Hepatitis B/C बाधित असल्याचा शासकीय रुग्णालयाचा अहवाल किंवा कुटुंबातील सदस्याचा वैद्यकीय अहवाल.
  • रेशन कार्डच्या पुढील आणि मागील पानाची प्रत.
  • इतर आवश्यक दस्तऐवज साक्षांकित प्रती स्वरूपात.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

आरबीएसके कक्ष,
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम ईमारत,
पहिला मजला, सामान्य रुग्णालय,
कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली – 442605.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025 ही अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख आहे. अंतिम तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
नोकरी अपडेटयेथे क्लीक करा

1 thought on “NHM New Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी”

Leave a Comment